अंढेरा येथे जमिनीच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी! दोन्ही गटांनी पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल…

खामखेड येथे शेतीच्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी; आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

अंढेरा (नंदकिशोर देशमुख : बुलडाणा कव्हरेज न्युज) गट क्रमांक ४७ या शेतजमिनीच्या ताब्यावरून अंढेरा येथील सेवा नगर भागात दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी, १८ जून २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी दोन्ही बाजूंवर स्वतंत्र गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

✅ मोतीराम राठोड यांची तक्रार!

सेवा नगर तांडा येथील मोतीराम भाऊराव राठोड (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गट क्रमांक ४७ मधील १ एकर शेती गेल्या १५ वर्षांपासून त्यांच्या ताब्यात आहे. या जमिनीबाबतचा वाद सध्या देऊळगाव राजा न्यायालयात सुरू आहे.१८ जून रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता, राठोड हे त्यांच्या कुटुंबासोबत शेतात असताना विजय श्रीराम चव्हाण व त्यांचे नातेवाईक जबरदस्तीने तिथे येऊन ट्रॅक्टरने पेरणी सुरू करू लागले. विरोध करताच राठोड कुटुंबाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जखमींना उपचारासाठी देऊळगाव मही आणि नंतर बुलढाणा रुग्णालयात हलवण्यात आले.या प्रकरणी गुन्हा क्रमांक ०१७५/२५ नोंदवून भादंवि कलम १८९(२), १९१(२)(३), १९०, ११८(१), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास PSI सुरेश जारवाल करत आहेत.

✅ विजय चव्हाण यांची तक्रार….

दुसऱ्या बाजूने, विजय श्रीराम चव्हाण (वय ४३, सेवा नगर तांडा) यांनी देखील १९ जून रोजी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गट क्रमांक ४७ मधील २१ आर शेती त्यांना उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा यांच्या आदेशानुसार १७ जून रोजी पंचनाम्यानंतर ताब्यात देण्यात आली.१८ जून रोजी सायंकाळी पेरणीसाठी ते शेतात असताना मोतीराम राठोड व त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली, असे विजय चव्हाण यांचे म्हणणे आहे.या प्रकरणी गुन्हा क्रमांक ०१७६/२५ अन्वये भादंवि कलम १८९(२), १९१(२)(३), १९०, ११८(१), ११५(२), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

✅ पोलिसांकडून दोन्ही बाजूंचा तपास सुरू…

या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले असून शेतजमिनीचा ताबा आणि न्यायालयीन प्रक्रिया हे वादाचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.प्रकरणाचा सखोल तपास अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सुरेश जारवाल करत आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!