सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): मुलगा होत नसल्याच्या कारणावरूनतसेच माहेरून दुचाकी खरेदीसाठी दोन लाख रुपये आणि नंतर पाच लाख रुपये आणण्याच्या मागणीवरून विवाहितेचा पतीसह १० शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप जणांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. राजा पोलीस ठाण्यात पतीसह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पळसखेड (म) येथील चंद्रकला गणेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून मुली झाल्यानंतर मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पतीकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच पतीने दुसरे लग्न केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
माहेरून दोन लाख रुपये दुचाकी खरेदीसाठी आणण्याची मागणी करण्यात आली. पैसे न आणल्याने मारहाण करून घराबाहेर काढल्याचेही तक्रारदार महिलेने म्हटले आहे. पुढे पाच लाख रुपये आणण्याची मागणी करून घरात प्रवेश न देण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणी पती गणेश शिंदे, दुसरी पत्नी संगीता शिंदे आणि अन्य आठ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३
मधील कलम ११५(२), ३(५), ३५१(२), ३५२ आणि ८५ अन्वये १८ नोव्हेंबर रोजी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. (श.प्र)













