Advertisement Advertisement

लग्न करून घरी आणलं, अन् हुंड्यासाठी छळ सुरू केला!विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ; पतीसह सासू-दीर पोलिसांच्या जाळ्यात!

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : लग्न होऊन सासरी नांदायला गेलेल्या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून हुंड्याची मागणी केल्याचा प्रकार शेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी ७ नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पतीसह सासू आणि दीर अशा तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादी विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर सासरी गेल्यानंतर पती अभिजीत सुरेश राऊत, सासू शशिकला सुरेश राऊत आणि दीर यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच हुंड्याची मागणी करून तिला त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, पीडित विवाहितेने याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!