Advertisement Advertisement

पैनगंगा नदीकाठावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण; पाणी नियोजनात कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय नको!चिखली-मेहकरच्या शेतकऱ्यांना समान न्याय द्या; पाणी आणि वीज प्रश्नावर ठोस निर्णय घेण्याची विनायक सरनाईक यांची मागणी….

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्याच्या नियोजनासह विविध मागण्यांसाठी पैनगंगा नदीकाठावरील पेनसावंगी पुलावर प्रकल्पग्रस्त शेतकरी
नंदू गुंजकर, विष्णू मोरे, शरद कणखर, गणेश जवंजाळ, विनोद मोरे, विकास मोरे, शुभम थोरात, यांच्यासह आदि शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.या उपोषणात शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी बोलताना त्यांनी चिखली-मेहकर तालुक्यांतील शेतकऱ्यांना समान न्याय देण्याची आणि चिखली तालुक्यातील प्रकल्पावरील शेतकऱ्यांवर
अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने पाण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन व संबंधित विभागाने करावे अशी मागणी सरनाईक यांनी बोलतांना केली.

वरखेड, पांढरदेव, नायगाव खुर्द, पेनसावंगी, भोरसा-भोरसी, मंगरूळ नवघरे, डोंगरगाव, घानमोड आणि मानमोड आदी गावांतील शेतकऱ्यांची हळद, तूर आणि जनावरांसाठीचा चारा वाचविण्यासाठी किमान दोन ते तीन पाणी देण्याची मागणी आहे. स्प्रिंकलर व ठिबक सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध करून दिल्यास उभी पिके वाचू शकतात.आणि स्पिकलर ,ठिबक मुळे पाण्याचा अपव्यय टाळता येईल त्यामुळे पाण्याबाबत शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कोणताही एकतर्फी निर्णय न घेता सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नियोजन करावे.

यासोबतच पेनटाकळी प्रकल्पाच्या उपसा सिंचनावर अवलंबून असलेल्या काही भागांतील शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे आधीच पाण्याअभावी संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. खंडित केलेला विद्युत पुरवठा तातडीने पूर्ववत जोडण्यात यावा. पाणी आणि वीज या दोन्ही प्रश्नांवर शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय प्रशासनाने घ्यावा, अशी मागणी सरनाईक यांनी केली.

यावेळी बोलताना विनायक सरनाईक म्हणाले की, उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे. चिखली आणि मेहकर तालुक्यांतील शेतकरी एकमेकांचे विरोधक नाहीत. दोन्ही भागांतील शेतकऱ्यांची उभी पिके आणि जनावरांसाठीचा चारा वाचविणे ही प्रशासन व लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा आवश्यक साठा राखून उर्वरित पाण्याचे समन्यायी नियोजन करावे.

पाण्याच्या प्रश्नावर राजकीय श्रेयवाद न करता प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा. उपोषण सुरू असताना मागण्यांकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना आंदोलनाची तीव्रता वाढविण्यास भाग पाडू नये. शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होऊन पेटल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा उपोषणकर्ते शेतकऱ्यांसह सरनाईक यांनी दिला.

शेतकऱ्यांना केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष पाणी उपलब्ध करून देण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा. पाण्याचे नियोजन करताना कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेऊन उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय द्यावा, असे आवाहनही विनायक सरनाईक यांनी केले.

उपोषणात शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग; विविध पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा…

या उपोषणाकर्ते नंदू गुंजकर, विष्णू मोरे, शरद कणखर, गणेश जवंजाळ, विनोद मोरे, विकास मोरे, शुभम थोरात,या़ंच्यासह आशिष जवंजाळ, नारायण शेजोळ, विनोद कणखर, रमेश कणखर,अमोल पाटील,शरद देशमुख, अनिल पाटील,संदिप ढोरे यांच्यासह परिसरातील धरणग्रस्त गावातील शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत.
यावेळी विविध पक्ष व संघटनेचे समाधान सुपेकर, शेतकरी संघटनेचे देविदास कणखर, समाधान कणखर, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक राष्ट्रवादी चे शंतनू बोंद्रे, संतोष परीहार, बाजार समिती मा.सभापती अशोकराव पडघान,सुधाकर धमक,विजय पाटील भाजपाचे कृष्णकुमार सपकाळ,अमोल साठे,बळीराम काळे, पोलीस पाटील प्रवीण पाटील यांनी उपोषणाला पाठिंबा देत सहभाग नोंदवला.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!