Advertisement Advertisement

खामगावात चौघांची मुजोरी! १५ वर्षांच्या पोरीशी गैरवर्तन केल्याचा आरोप; हात धरून ओढलं, धमकीही दिल्याची तक्रार! ग्रामीण पोलिसांनी चौघांवर गुन्हा ठोकला!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला जवळ ओढल्याचा, अश्लील हावभाव केल्याचा आणि धमकीवजा वक्तव्य केल्याचा गंभीर प्रकार खामगाव तालुक्यात समोर आला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीची १५ वर्षीय मुलगी जात असताना कृष्णा महारखेडे याने तिच्या मागून येत वाईट उद्देशाने तिचा हात पकडून तिला जवळ ओढल्याचा आरोप आहे. तसेच, मुलीच्या आतेभावाने यापूर्वी दिलेल्या तक्रारीचा संदर्भ देत आरोपीने मुलीशी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे आणि अश्लील हावभाव केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, या घटनेच्या वेळी अन्य तीन जणही घटनास्थळी आल्याचा आरोप आहे. त्यांनी पहिल्या आरोपीला चिथावणी देत मुलीला सोबत घेऊन जाण्याबाबत तसेच मागील घटनेचा बदला घेण्याबाबत वक्तव्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी कृष्णा विलास महारखेडे (अंदाजे वय १८), रुपेश कैलास महारखेडे (अंदाजे वय १९), गौरव सुभाष महारखेडे (वय २०) आणि विलास शिवलाल महारखेडे (अंदाजे वय ४२), सर्व रा. खामगाव तालुका, यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ३(५) तसेच पॉक्सो कायद्यातील कलम ८, १२ आणि १७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पुसाम यांच्याकडे सोपविण्यात आला असून खामगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत. तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासादरम्यान स्पष्ट होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!