Advertisement Advertisement

गावाबाहेर गेली अन् पोरी बेपत्ता झाली!१५ वर्षांच्या मुलीला कुणी पळवून नेलं?आईची पोलिसांत धाव, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल!

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसांत दिली आहे. या तक्रारीवरून १९ ऑक्टोबर रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी गावाबाहेर शौचालयासाठी गेली होती. यावेळी अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचे तिच्या आईने तक्रारीत नमूद केले आहे. मुलगी घरी परतली नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!