Advertisement Advertisement

२० हजार टाका, ५ लाख उचला म्हणत तरुणाला लुबाडलं..! व्हॉट्सअ‍ॅपवर आमिष, खामगाव तालुक्यात फसवणुकीचा खेळ उघड..!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : “२० हजार द्या अन् ५ लाख घ्या” असं गोड बोलून एका २२ वर्षांच्या तरुणाला गंडा घातल्याचा प्रकार खामगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम ३१८, ३१८ (२) व ३ (५) अन्वये कायमस्वरूपी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अभिषेक कुमार संजय साहू (वय २२, शिक्षण एम.कॉम., रा. नंदन नगर तिफरा यदू, बिलासपूर, छत्तीसगड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास ग्राम माक्ता शिवार, ता. खामगाव येथे ही घटना घडली. अज्ञात आरोपींनी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधत २० हजार रुपये दिल्यास ५ लाख रुपये परत देण्याचे आमिष दाखवले.

गोड बोलण्यात अडकलेल्या तरुणाची रक्कम लंपास करण्यात आली. या प्रकरणी २ मार्च रोजी पहाटे १.२२ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!