Advertisement Advertisement

विहिरी वरील सोलर पंपाच्या हिस्स्यावरून भाऊकीत तुफान मारहाण; ७ जणांविरुद्ध गुन्हा….

देऊळगावराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):भाऊकीत सुरू असलेल्या शेतीच्या जुन्या वादातून विहिरीवरील सोलर पंपातील हिस्सा मागितल्याच्या कारणावरून एका कुटुंबावर लोखंडी पाइप व गजाने मारहाण करण्यात आल्याची घटना देऊळगावराजा तालुक्यातील रोहणा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल दत्तू खारात (रा. रोहणा) हे शेतीचे काम करतात. आरोपी हे त्यांच्या भाऊकीतील नातेवाईक असून शेतीच्या जुन्या वादातून त्यांच्यात मतभेद सुरू होते. दरम्यान अमोल खारात यांनी विहिरीवरील सोलर पंपामध्ये आपला हिस्सा मागितल्याने वाद अधिक चिघळला.

यावेळी आरोपी विलास उत्तम खारात (रा. रोहणा) यांनी अमोल खारात यांच्या डोक्यात लोखंडी गजाने वार केला. तसेच हर्षद विलास खारात, विशाल विलास खारात व आकाश अशोक खारात यांनी अमोल यांच्या आई-वडील व पत्नीस लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तसेच संगीता विलास खारात, कु. प्रिती विलास खारात व सौ. वच्छला अशोक खारात यांनी शिवीगाळ करत चापट-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध कायम अप.क्र. ९०/२०२६ अन्वये कलम १८९(२), १९०(२), १९१(२), ११८(१), ११५(२), ३२४(४), ३५१(२), ३५१(३), ३५२ बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!