Advertisement Advertisement

कवठळ रोडवर भीषण अपघात; शिक्षिकेचा जागीच मृत्यू, चालक फरार….

कवठळ (बुलडाणा कव्हरेज न्युज): होळीच्या दिवशी शाळेसाठी निघालेल्या शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना २ मार्च रोजी सकाळी ६:४५ वाजताच्या सुमारास कवठळ-भेंडवळ रोडवर घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पातूर्डा बुद्रुक येथील रहिवासी वृषाली प्रकाश गावंडे या पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. होळीच्या दिवशी सकाळची शाळा असल्याने त्या (एमएच २८ ए एल ५८१५) क्रमांकाच्या स्कुटीने शाळेकडे जात होत्या. दरम्यान, कवठळ-भेंडवळ मार्गावर एका दूध संकलन केंद्राच्या सेंट्रो कारने त्यांच्या स्कुटीला मागून जोरदार धडक दिली.


या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आणि डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक गाडीसह फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!