Advertisement Advertisement

प्रेशर कुकरचा स्फोट; विवाहिता गंभीर जखमी….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):
शहरातील शंकरनगर परिसरात स्वयंपाक करत असताना प्रेशर कुकरचा अचानक स्फोट झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत शबनम परवीन शेख युसूफ (वय ३०) ही विवाहिता गंभीर जखमी झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शबनम परवीन या आपल्या राहत्या घरी स्वयंपाक करत असताना कुकरचा जोरदार स्फोट झाला. या स्फोटात त्यांच्या चेहरा व मानेच्या भागाला गंभीर दुखापत झाली. मोठा आवाज होताच घरातील सदस्य व शेजाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.


जखमी महिलेला त्वरित खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


या घटनेनंतर नागरिकांनी स्वयंपाक करताना प्रेशर कुकर वापरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!