Advertisement Advertisement

ब्रेकअप नंतर फोटो-व्हिडिओ डिलीट करण्यासाठी तुझ्या सोबत शेवटच एगदा…! खुलताबादच्या लॉजवर २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार…

खुलताबाद (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): ब्रेकअप झाल्यानंतरही जुन्या फोटो-व्हिडिओच्या आधारे धमकी देत एका २९ वर्षीय तरुणाने २२ वर्षीय तरुणीवर लॉजवर नेऊन जबरदस्ती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी नंद्राबाद (ता. खुलताबाद) परिसरात घडली असून याप्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी आणि संशयित यांच्यात पूर्वी प्रेमसंबंध होते. काही कारणांमुळे दोघांचे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर संशयित यश ऊर्फ गौरव दत्तू गायकवाड (वय २९, रा. अंगुरीवाग फकीरवाडी, छत्रपती संभाजीनगर) याने तरुणीशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने संबंध पुन्हा सुरू करण्यास नकार दिल्यानंतर त्याने तिचे जुने फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

तसेच ते फोटो-व्हिडिओ डिलीट करण्यासाठी एकदा शरीरसंबंध ठेवण्याची अट घालत तिला खुलताबाद येथील एका लॉजवर बोलावून घेतले. तेथे नेऊन तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकारानंतर घाबरलेल्या तरुणीने मैत्रिणींच्या मदतीने पोलिसांत धाव घेतली.

घटनास्थळ खुलताबाद हद्दीत असल्याने प्रकरण खुलताबाद पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले. पोलिसांनी २८ फेब्रुवारी रोजी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या सूचनेनुसार तरुणीने संशयिताला बोलावून घेतले असता तो येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास खुलताबाद पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!