बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आज बुलडाणा जिल्ह्यातील सर्व नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या निकालामुळे काही ठिकाणी आनंदाचा माहोल तर काही ठिकाणी तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.
चिखली, बुलडाणा, मेहकर आणि सिंदखेड राजा येथे निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही निवडणूक अनेक दिग्गज नेत्यांसाठी प्रतिष्ठेची ठरल्याने “कुठं खुशी, कुठं गम” अशीच अवस्था जिल्ह्यात दिसून आली.
जिल्ह्यातील प्रमुख निकाल पुढीलप्रमाणे…चिखली : भाजपचे पंडित देशमुख विजयीबुलडाणा : शिवसेना (शिंदे गट)च्या पुजा ताई गायकवाड यांचा विजयसिंदखेड राजा : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे सौरभ तायडे निवडून आलेदेऊळगाव राजा : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे शिपने विजयीखामगाव : भाजपचे अर्पण फुंडकर यांचा विजयशेगाव: प्रकाश शेगोरकर काँग्रेसनांदुरा: मंगला मुरेकर भाजपलोणार: मीरा मापारी काँग्रेसनिकालानंतर काही ठिकाणी जल्लोष सुरू असला तरी, जिल्ह्यात आज व उद्या तणावाचे वातावरण राहण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क आहे.
“कुठं जल्लोष, कुठं तणाव…! बुलडाणा जिल्ह्यात नगरपालिकेच्या निकालानं रंगला आजचा दिवस”… कोण कुठ…













