Advertisement Advertisement

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित युवतीने ऑनलाईन तक्रार दाखल केली असून शहर पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवती व आरोपी यांची ओळख शिक्षण घेत असताना झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले व आरोपीने युवतीला विश्वासात घेऊन लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर आरोपीने युवतीला शहरातील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


तक्रारीनुसार, लग्नाचे आश्वासन दिल्यामुळे युवती आरोपीसोबत तब्बल चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, कालांतराने आरोपीने लग्नास नकार दिला. फसवणूक व अत्याचार झाल्याची जाणीव झाल्यानंतर युवतीने पोलिसांत तक्रार दाखल करून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.


या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव हे करीत आहेत.


या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!