Advertisement Advertisement

कर्जबाजारीपणाला कंटाळून टाकळीतील शेतकरीपुत्राची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली….

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील टाकळी (वाघजाळ) येथे २९ वर्षीय शेतकरीपुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. ही घटना मंगळवार, १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास समोर आली. मृत तरुणाचे नाव अंकुश प्रल्हाद हरमकार (वय २९) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश हरमकार हा आपल्या भावासोबत टाकळी येथे वास्तव्यास होता. गट नं. १९७ मध्ये त्याची १.३३ आर शेती असून शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. कर्जबाजारीपणा व आजारपणाला कंटाळून त्याने शेतीतच सायंकाळच्या सुमारास गळफास घेऊन जीवन संपविल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती गावाचे पोलिस पाटील सुरेंद्र शिराळे यांनी बोराखेडी पोलिसांना दिली. माहिती मिळताच बीट जमदार बळीराम खंडागळे व रायटर शेख इसाक यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!