घरगुती वादातून वडिलांवर काठीने हल्ला; मुलगा व सून विरुद्ध गुन्हा…

मंगरुळ नवघरे (बुलडाणा कव्हरेज न्युज): घरगुती कारणावरून झालेल्या वादातून मुलाने आपल्या वडिलांच्या डोक्यात काठीने मारहाण केल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास मंगरुळ नवघरे येथे घडली. या प्रकरणी अमडापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मधुकर गणपत जाधव (वय ५५, रा. मंगरुळ नवघरे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विशाल मधुकर जाधव व पल्लवी विशाल जाधव (दोन्ही रा. मंगरुळ नवघरे) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८ (१), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, घरगुती कारणावरून वाद झाल्यानंतर आरोपी विशाल जाधव याने काठीने फिर्यादींच्या डोक्यात मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच आरोपी पल्लवी जाधव हिने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

ही घटना ११ फेब्रुवारी रोजी घडली असून १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १.४२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा जीपीएसआय अच्युतराव शिरसाट यांनी नोंदविला असून, ठाणेदार राजपुत यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक दिलीप तोंडे पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!