Advertisement Advertisement

“भावी खासदार खेडेकर?” सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ..!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर सुरू असलेल्या मोहिमेची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. “भावी खासदार डॉ. शशिकांत खेडेकर?” अशा आशयाच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही पोस्ट नेमकी कोणी टाकली आणि त्यामागे काय हेतू आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.


काही जणांच्या मते ही पोस्ट कुणाच्या खोडसाळपणातून व्हायरल झाली असावी, तर काहींच्या मते आगामी राजकारण डोळ्यासमोर ठेवून ही मोहीम जाणीवपूर्वक राबवली जात आहे. त्यामुळे या पोस्टमुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चांना चांगलाच उधाण आले आहे.


दरम्यान, विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचे केंद्रातील राजकारणात भक्कम वजन मानले जाते. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीतच “भावी खासदार” अशा पोस्टची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग येत असताना या सोशल मीडिया मोहिमेमुळे वातावरणाला नवा रंग चढला असून पुढे या चर्चेला नेमके कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!