चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यातील एका गावातील अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. २२ वर्षाच्या तरुणाने १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकारातून मुलगी गरोदर राहिल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे…
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी चिखली तालुक्यातील एका गावातील वास्तव्यास आहे. आरोपी सागर शेषराव सुरडकर (वय २२,) याने १५ जून २०२५ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुलगी घरी एकटी असताना ‘वळती’ शेत शिवारात तिच यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे…
मुलीच्या पोटात दुखू लागल्याने आईने तिला दवाखान्यात नेले. तपासणीदरम्यान मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, मुलीने तिच्या सोबत झालेला संपूर्ण पराक्रम सांगितला…
पोलीस कारवाई आणि गुन्ह्याची कलमे…..
पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दाखल कलमेः भारतीय न्याय संहिता (BNS) ६४(२) (f), ६४(२) (h), ६४(२) (i), ६४(२) (m), ६५ (२) आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ६, १०, १२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील आणि ठाणेदार भूषण गावंडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गाडे आणि रोहिदास पंढरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत













