Advertisement Advertisement

“माझ्यासोबत चल, लग्न करतो” म्हणत अल्पवयीन मुलीला फूस लावायचा प्रयत्न..! शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या गंभीर आरोपावरून शेगाव शहरातील एका तरुणाविरुद्ध शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७५, ७८, ३५१ (२) तसेच पोस्को कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनिकेत बाबुराव खेर्डे (रा. जुने महादेव मंदिर परिसर, शेगाव) याच्याविरुद्ध कायम अप क्रमांक १०५/२६ नोंदविण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, ६ ते २५ फेब्रुवारी दरम्यान दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास फिर्यादी व त्यांची अल्पवयीन मुलगी या वियोगी नगर येथील गेट क्रमांक २८ येथे नातेवाईकांच्या भागवत समाप्ती कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रमादरम्यान मुलगी एकटी असताना आरोपीने तिचा उजवा हात पकडून, “तू माझ्यासोबत चल, तू मला खूप आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करतो,” असे म्हणत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

मुलीने आरोपीसोबत जाण्यास ठाम नकार देत तेथून निघून जाऊन घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. तसेच आरोपीने तिचा पाठलाग करून धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आरोपीने वाईट उद्देशाने जबरदस्तीने हात पकडून विनयभंग केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत शेगाव शहर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बरींगे हे करीत आहेत

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!