Advertisement Advertisement

“अपघाताचा बनाव करून बायकोचा गेम केला; पतीनंच दिली एक लाखाची सुपारी…!”

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील कवठळ गावाजवळ २ मार्च रोजी झालेला महिलेला झालेला अपघात हा साधा अपघात नसून नियोजित खून असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पत्नी वृषाली प्रकाश गावंडे हिचा खून करण्यासाठी तिच्या पतीनेच कारचालकाला सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६ मार्च रोजी पती प्रकाश गावंडे आणि कारचालक मनीष सूर्यवंशी यांना अटक केली असून आणखी एक आरोपी फरार आहे. न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांना सुरुवातीला ही घटना अपघाताची वाटत होती. वृषाली गावंडे या पातुर्डा येथून पिंपळगाव काळे येथे दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार दाखल झाली होती. मात्र पोलिसांना संशय आल्याने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपास केला असता हा अपघात नसून खुनाचा कट असल्याचे उघड झाले.

तपासादरम्यान कारचालक मनीष सूर्यवंशीला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. वृषालीचा पती प्रकाश गावंडे आणि त्याचा साथीदार मंगेश चुलकार (रा. पातुर्डा) यांनी मिळून एक लाख रुपयांची सुपारी देऊन कारने धडक देत खून करण्याचा कट रचल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे पत्नीचा जीव घेण्यासाठी पतीने यापूर्वी तीन वेळा विष देण्याचाही प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!