Advertisement Advertisement

शाळेला जाताना पोरीचा रोज पिच्छा करायचा; नकार देऊन बी त्रास थांबेना, मग शेवटी पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं…!

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आंधुड येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिचा त्रास केल्याच्या आरोपावरून २० वर्षीय तरुणाविरुद्ध डोणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ५ सप्टेंबर रोजी पोलिसांच्या निदर्शनास आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १५ वर्षे ११ महिने २८ दिवसांची असून ती आंधुड येथील रहिवासी आहे. पवन सुभाष अंभोरे (वय २०, रा. आंधुड, ता. मेहकर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणींसोबत शाळेत जात असताना आरोपी तिचा पाठलाग करीत असल्याचा आरोप आहे. यावेळी आरोपीने मुलीला, “तू माझ्यासोबत का बोलत नाहीस?” असे विचारले. त्यावर मुलीने त्याच्याशी बोलायचे नसल्याचे स्पष्ट सांगितले. मात्र, त्यानंतरही आरोपीने तिच्याशी बोलण्याचा आग्रह धरल्याचे तसेच तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या मुलीने आपल्या वडिलांसोबत डोणगाव पोलीस ठाणे गाठून तोंडी तक्रार दिली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी ५ सप्टेंबर रोजी आरोपी पवन अंभोरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम ७४ व ७८ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO), २०१२ मधील कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास डोणगाव पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!