Advertisement Advertisement

बसच्या गर्दीत १६ वर्षांच्या पोरीला हात लावला; शेगाव पोलिसांनी तरुणावर गुन्हा ठोकला!

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : महाविद्यालयातून घरी जाण्यासाठी बसने प्रवास करणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बसमध्ये विनयभंग केल्याच्या आरोपावरून शेगाव शहर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम ७४, ७५ तसेच POCSO कायद्यातील कलम ८ आणि १२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी महाविद्यालय सुटल्यानंतर भोनगावकडे जाणाऱ्या बसमध्ये घरी जाण्यासाठी बसली होती. याच बसमध्ये आरोपी मनट्या तिरमक मोरखडे (रा. भोनगाव) हा तिच्या मागे येऊन पाठीमागील आसनावर बसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

बस शेगाव-वरवट रोडने जात असताना भारत गॅस गोडाऊनजवळ सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता आरोपीने वाईट उद्देशाने मागून अल्पवयीन मुलीला स्पर्श करून तिच्या पोटाला पकडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटनेनंतर पीडित मुलीने शेगाव शहर पोलिसांकडे तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध BNS कलम ७४, ७५ आणि POCSO कायद्यातील कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास शेगाव शहर पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!