Advertisement Advertisement

रानडुकराचा शेतात धुमाकूळ; हल्ल्यात दोन महिला जखमी….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतात काम करीत असताना अचानक रानडुकराने हल्ला केल्याने दोन महिला जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सुमारे ९ वाजताच्या दरम्यान तालुक्यातील कोलोरी येथे घडली. या घटनेमुळे कोलोरी परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, यशोदा मारुती गुधदे (वय ६५) आणि रंजना दुर्योधन सिरसाट (वय ४८), दोन्ही रा. कोलोरी, या दोन्ही महिला शेतात काम करीत होत्या. यावेळी अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही महिला जखमी झाल्या.

घटनेनंतर त्यांच्या नातेवाईक आदित्य सिरसाट यांनी तत्काळ दोन्ही महिलांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. सध्या सामान्य रुग्णालयातील वार्ड क्रमांक ३ मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही जखमी महिलांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.

दरम्यान, कोलोरी शेतशिवार परिसरात रानडुकरांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वनविभागाने परिसरात पाहणी करून रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!