Advertisement Advertisement

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, क्लीनर जखमी….

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : समृद्धी महामार्गावर डोणगाव पोलीस स्टेशनअंतर्गत नागपूर कॉरिडोरच्या चॅनेल क्रमांक २६९.४०० वर मंगळवारी, ४ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ५ वाजता भीषण अपघात झाला. चालकाला झोपेची डुलकी लागल्याने भरधाव मालवाहू ट्रक समोरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाला मागून धडकला. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर क्लीनर किरकोळ जखमी झाला.

झोपेची डुलकी लागल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटले…

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरजे-१२-जीडी-४४१२ क्रमांकाचा मालवाहू ट्रक मुंबईकडून नागपूरच्या दिशेने जात होता. ट्रक डोणगावजवळील नागपूर कॉरिडोर परिसरात आला असता चालक लेकराच अचानक झोपेची डुलकी लागली.

त्यामुळे भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला जोरदार धडकला. धडक एवढी भीषण होती की ट्रकच्या केबिनचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला.

चालकाचा जागीच मृत्यू….

या अपघातात चालक लेकराच याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ट्रकमधील क्लीनर सोनू निरंजन निषाद (रा. फरे, जि. मथुरा, उत्तर प्रदेश) हा किरकोळ जखमी झाला.

महामार्ग पोलिसांची घटनास्थळी धाव…

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून वाहतूक सुरळीत केली. जखमी क्लीनरला अॅम्बुलन्सद्वारे उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहन चालवताना झोप येत असल्यास वाहन थांबवून विश्रांती घेण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!