जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज): माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय वेरूळकर करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ८५ व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, पती तसेच त्याच्या नातेवाईकांनी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला. याशिवाय इतर आरोपींनी मुख्य आरोपीला भडकावून फिर्यादीचा छळ करण्यास प्रवृत्त केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
सदर घटना मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील पटेल मोहल्ला, बहादूरपुरा येथे घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित तक्रारीच्या आधारे जळगाव जामोद पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.















