Advertisement Advertisement

“लग्न कर म्हणताच प्रियकराचं काळीज काळं! “डिक्कीत प्रेयसीचा मृतदेह… मुंबई गाठायच्या आधीच पोलिसांनी त्याचा डाव फसवला!, माजी सरपंच महिलेसोबत… प्रियकराच्या कृत्यानं गाव हादरलं….

भिवंडी/शाहूवाडी (नेटवर्क कव्हरेज ग्रुप) : माझ्याशी लग्न कर, असा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकरानेच खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या माजी सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे (वय ५०) यांचा खून झाल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी संशयित आरोपी प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील (वय ४०, रा. शिरगाव) याला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. खून केल्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबईच्या दिशेने जात असताना पोलिसांच्या कारवाईत हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने भिवंडीसह शाहूवाडी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी संदेश सर्जेराव मोरे (वय २७, रा. अंजूर फाटा, भिवंडी) यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा न्यारे आणि आरोपी प्रकाश ऊर्फ बाबू पाटील हे एकमेकांच्या परिचयातील होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यानंतर सुरेखा न्यारे यांनी बाबू पाटील याच्याकडे लग्नासाठी तगादा लावल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याच कारणावरून दोघांमध्ये वाद होत असल्याची माहितीही पुढे आली आहे.

शिरगाव परिसरात गाठून खून केल्याचा आरोप

रविवार, २६ जुलै रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आरोपी बाबू पाटील याने शिरगाव येथील लिंडोरीचा वाडा परिसरात सुरेखा न्यारे यांना गाठले. याठिकाणी त्याने त्यांचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने तो स्वतःच्या वाहनातून मृतदेह घेऊन भिवंडीच्या दिशेने रवाना झाला.

कारच्या डिक्कीत मृतदेह आढळल्याने खुनाचा उलगडा

भिवंडी परिसरात पोलिसांनी संशयावरून वाहनाची तपासणी केली असता कारच्या डिक्कीत सुरेखा न्यारे यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता संपूर्ण प्रकार समोर आला. शिरगाव येथे खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो मुंबईच्या समुद्रात टाकण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचे तपासात समोर आले.

दरम्यान, भिवंडी तालुक्यातील कशेळी परिसरात पोहोचल्यानंतर आरोपीने आपल्या भाच्याला फोन करून पुढील हालचालींबाबत माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, भाच्याने सतर्कता दाखवत पोलिसांना माहिती दिल्याने नारपोली पोलिसांनी आरोपी बाबू पाटील याला ताब्यात घेतले.

या घटनेचा उलगडा होताच शाहूवाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली. सुरुवातीला भिवंडी पोलिसांत दाखल झालेले हे प्रकरण पुढील तपासासाठी शाहूवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि एस. एन. सूर्यवंशी करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!