Advertisement Advertisement

रामनगरच्या हॉटेलावर चोरट्याचा डल्ला! गॅस टाकीपासून रोख ६ हजारांपर्यंत सगळंच लंपास!२१ हजारांचा मुद्देमाल चोरून अज्ञात पसार; अंढेरा पोलिसांत गुन्हा….

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळगाव राजा–चिखली मार्गावरील रामनगर येथे अज्ञात चोरट्याने चहा-नाश्त्याचे हॉटेल फोडून गॅस टाकी, गॅस भट्टी, टेबल फॅन, वापरातील भांडी, वेफर्स, चिप्स तसेच रोख ६ हजार रुपये असा एकूण २१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २२ जुलै रोजी उघडकीस आली. या प्रकरणामुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत नंदकिशोर दौलत भगत (वय ४२, रा. रामनगर, ता. चिखली) यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. नंदकिशोर भगत व त्यांची आई रामनगर येथे चहा-नाश्त्याचे हॉटेल चालवितात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जुलै रोजी रात्री हॉटेल बंद करून ते घरी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने हॉटेलच्या जाळीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आतील दरवाजाचे कुलूपही तोडून हॉटेलमधील साहित्याची चोरी केली.

२२ जुलै रोजी सकाळी हॉटेल उघडण्यासाठी गेल्यानंतर जाळी व दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. पाहणी केली असता गॅस टाकी, गॅस भट्टी, टेबल फॅन, वापरातील भांडी, वेफर्स, चिप्स आणि रोख ६ हजार रुपये असा एकूण २१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) व ३३४(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सिद्धार्थ सोनकांबळे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!