Advertisement Advertisement

बाप-लेकाने एकाच चाळीत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली! बुलडाणा जिल्ह्यातील घटना….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): खामगाव तालुक्यातील पारखेड येथील शेतकरी पिता-पुत्राने स्वतःच्या शेतातील कांद्याच्या चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना शनिवारी (दि. १९ जुलै) सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे पारखेड परिसरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पारखेड येथील रहिवासी संतोष हरिश्चंद्र गावंडे (वय ५०) यांची जळका भडंग शिवारात शेती आहे. शनिवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास संतोष गावंडे आणि त्यांचा मुलगा अक्षय उर्फ विठ्ठल संतोष गावंडे (वय ३०) यांनी शेतातील कांद्याच्या चाळीत लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.

दरम्यान, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

अक्षय गावंडे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार असून, या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!