Advertisement Advertisement

“आई बँकेत, लेक गोंद आणायला गेली; परत आलीच नाही!”अल्पवयीन मुलीचा शोध सुरू!”

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): तालुक्यातील धरणगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत तिच्या आईने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील निशा सुनील निकम (वय ३६) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ९ जुलै रोजी दुपारी सुमारे १.३५ वाजता त्या आपल्या मुलगी सांची सुनील निकम (वय १६) हिच्यासह स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत कामानिमित्त गेल्या होत्या. बँकेतील फॉर्मवर फोटो चिकटविण्यासाठी गोंद आणते असे सांगून सांची बाहेर गेली. मात्र बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने तिचा नातेवाईक व परिसरात शोध घेण्यात आला. तरीही ती आढळून आली नाही.

याप्रकरणी अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा क्रमांक ५०८/२०२६ नोंदवत कलम १३७(२), भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत झेंडगे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!