Advertisement Advertisement

अज्ञात वाहनाची धडक; शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू…! बोराखेडी पोलिसांत अपघाती मृत्यूची नोंद….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):
तालुका मोताळा अंतर्गत तालखेड–शेलापुर रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू आहे.


मृतक मोतीला नथ्था मानकर (रा. चिरीया मुंडीया, जि. खरगोन, मध्य प्रदेश) हा २१ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास किराणा साहित्य घेऊन पायी शेताकडे जात असताना सुपडा पाटील यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. वाहन चालकाने निष्काळजी व हलगर्जीपणे वाहन चालविल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.


अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोतीला मानकर यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.


मृतकाचा गावाकडील पत्ता उपलब्ध नसणे, पत्नी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असणे तसेच नातेवाईक पुढे न आल्यामुळे सुरुवातीला कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. अखेर मृतकाच्या मालकाने व फिर्यादी प्रशांत दिनकर चोपडे (वय ५९, रा. तालखेड, ता. मोताळा) यांनी २९ जानेवारी २०२६ रोजी बोराखेडी पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिल्यानंतर अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली.


या प्रकरणी अपघाती क्रमांक ४४/२०२६ अन्वये कलम १०६ (१) BNS २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोहेका विजयकुमार सुरडकर (ब.क्र. २३६२) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!