धामणदरी भागातील १९ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून!

धामणदरी भागातील १९ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून!

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): गौतमनगर धामणदरी परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय सनी सुरेश जाधव या युवकाचा छातीत आणि पोटात चाकू खुपसून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज (२ ऑगस्ट) चिखली रोडवरील संजीवनी मार्बलजवळील एका बांधकामाजवळ घडली.

प्राथमिक माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी सनीवर अचानक हल्ला करून त्याच्या छातीत आणि पोटात चाकूने वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच अतिरक्तस्त्राव होऊन बेशुद्ध पडला. नागरिकांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणात पाच जणांवर पोलिसांचा संशय असून, त्यांनी खून प्रेम प्रकरणातून केला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत आणि पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “धामणदरी भागातील १९ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून!”

Leave a Comment

WhatsApp Join Group!