Advertisement Advertisement

भावालाच भावाचा चांगल दिसला नाही.. शेतरस्त्याच्या वादातून गोठ्याला आग; २.७५ लाखांचे नुकसान…

सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) –शेतरस्त्याच्या वादातून चुलत भावानेच गोठ्याला आग लावल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील जळगाव येथे घडली. या आगीत एक गाय, २५ पोती धान्य, ३७ पोती खत, शेतीची औजारे व इतर साहित्य जळून खाक झाले असून, सुमारे २ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

जळगाव येथील विष्णू हरीभाऊ वाघ आणि दत्तात्रय नारायण वाघ हे दोघे चुलत भाऊ असून, त्यांच्या दरम्यान शेतरस्त्याच्या मालकीसंदर्भात वाद सुरू होता. या वादातूनच दत्तात्रय वाघ यांनी बुधवारी (दि. १७ जुलै) सायंकाळी विष्णू वाघ यांच्या गोठ्याला पेटवून दिल्याची तक्रार आहे.गोठ्यात त्यावेळी गायही बांधलेली होती. आग इतकी भीषण होती की, गोठ्यातील गाय जागीच जळून मृत्युमुखी पडली आणि शेतमाल, खत, औजारे पूर्णतः भस्मसात झाले.

या प्रकरणी विष्णू वाघ यांच्या फिर्यादीवरून सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात दत्तात्रय वाघ यांच्या विरोधात विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!