Advertisement Advertisement

“साहेब, हा घ्या पुरावा!” ट्रॅफिक पोलिसांच्या संरक्षणातच चिखलीत वाळू माफियांना मोकळा राज?

"साहेब, हा घ्या पुरावा!" ट्रॅफिक पोलिसांच्या संरक्षणातच चिखलीत वाळू माफियांना मोकळा राज?

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली शहरात वाळू माफियांचा बेकायदा धंदा जोरात सुरू असून, याला ट्रॅफिक पोलिसांचे संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप युवा सेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी केला आहे. सामान्य नागरिकांना किरकोळ नियमभंगासाठी थांबवून दंड ठोठावला जात असताना, वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्यांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

आज सकाळी चिखली ते जालना महामार्गावरील मेहकर फाट्यावर हा प्रकार उघडकीस आला. या ठिकाणी ट्रॅफिक पोलिस उपस्थित असतानाही अनेक वाळूच्या गाड्या बिनधास्तपणे रस्त्यावरून जाताना दिसल्या. “सामान्य माणसाला सिग्नल तोडला म्हणून चालान फाडणारे पोलिस वाळू माफियांच्या गाड्यांना का थांबवत नाहीत? हा कोणता न्याय आहे?” असा थेट सवाल भुतेकर यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी पोलिस यंत्रणेच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सिंदखेडराजात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी डॉ. राजेंद्र शिंगणेंचा एल्गार; १४ जुलैला भव्य मोर्चाचे आयोजन, राज्य सरकारला विचारणार जाब!

स्थानिक नागरिकांमध्येही या प्रकाराबाबत प्रचंड असंतोष पसरला आहे. अनेकांनी यापूर्वी पोलिस आणि प्रशासनाकडे वाळूच्या अवैध वाहतुकीविरोधात तक्रारी केल्या होत्या. मात्र, ठोस कारवाईचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत संशय वाढत आहे. “वाळू माफियांमुळे रस्त्यांची अवस्था खराब होत आहे, पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. तरीही प्रशासन गप्प का?” असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी विचारला आहे.

युवा सेनेचे संतोष भुतेकर यांनी पोलिस प्रशासनाला या प्रकरणी तात्काळ खुलासा करण्याची मागणी केली आहे. “ट्रॅफिक पोलिसांनी आपली जबाबदारी पारदर्शकपणे पार पाडावी आणि वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी,” असे त्यांनी सांगितले. तसेच, या अवैध धंद्यामागे पोलिसांचा सहभाग असल्यास संबंधितांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी लावून धरली आहे.

या प्रकरणी स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणा काय पावले उचलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. वाळू माफियांचा हा बेकायदा धंदा रोखण्यासाठी प्रभावी कारवाई होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

WhatsApp Join Group!