अंढेरा (नंदकिशोर देशमुख- बुलडाणा कव्हरेज न्यूज): आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त देऊळगाव राजा तालुक्यातील श्री औढेश्वर विद्यालय, अंढेरा येथे ‘नशा मुक्त भारत अभियान’ अंतर्गत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात हे अभियान राबवण्यात येत आहे.आज सकाळी अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री. रुपेश शक्करगे व पोलीस उपनिरीक्षक श्री. सुरेश जारवाल यांनी विद्यालयात उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
त्यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावून सांगितले.”नशा केल्याने जीवनच उद्ध्वस्त होते, अभ्यास आणि कष्टच यशाचे खरे मार्ग आहेत,” असे प्रतिपादन त्यांनी केले.पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंमली पदार्थांचे सेवन केल्याने केवळ व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. अशा वाईट सवयींपासून दूर राहणे आवश्यक आहे.
त्यांनी महिला सुरक्षा आणि मदतीसाठी उपलब्ध असलेल्या हेल्पलाईनबाबतही माहिती दिली.विद्यार्थ्यांनी ही मार्गदर्शनपर माहिती अत्यंत उत्सुकतेने ऐकली व नशामुक्त समाज घडवण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याचा संकल्प केला.कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या सहकार्याने करण्यात आले होते. उपस्थित पोलीस अधिकारी व शाळा प्रशासनाचे विद्यार्थ्यांनी आभार मानले.