Advertisement Advertisement

रात्री घरात सगळ्यांनी एकत्र जेवण केलं, गाढ झोपले अन् पहाटे बाप उठला तर….!

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील काबरखेड येथे मध्यरात्रीच्या सुमारास २२ वर्षीय तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. पहाटे झोपेतून उठल्यानंतर मुलगी घरात दिसून न आल्याने कुटुंबीयांची एकच धावपळ उडाली. गावातीलच एका तरुणाने मुलीला पळवून नेल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला असून, त्यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

काबरखेड येथील दिनकर बुधाजी बावस्कर यांनी याप्रकरणी बोराखेडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २४ नोव्हेंबर रोजी रात्री कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र जेवण केल्यानंतर झोप घेतली होती. मात्र, २५ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बावस्कर यांना जाग आली असता त्यांची २२ वर्षीय मुलगी भारती घरात दिसून आली नाही.

मुलगी अचानक बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच वडिलांनी घराच्या आसपास तसेच संपूर्ण गावात तिचा शोध घेतला. नातेवाईक आणि परिचितांकडेही चौकशी करण्यात आली. मात्र, बराच शोध घेऊनही भारतीचा कुठेच पत्ता लागला नाही.

दरम्यान, गावातीलच राजू समाधान मापारी याने मुलीला पळवून नेल्याचा संशय वडिलांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. या तक्रारीच्या आधारे बोराखेडी पोलिसांनी संशयित राजू समाधान मापारी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४० (३) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता तरुणीचा शोध आणि पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!