Advertisement Advertisement

कोनड खुर्दचा ३२ वर्षांचा प्रकाश घराजवळून गायब; कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार!अंढेरा पोलिसांत गुन्हा! कोणाला दिसला तर कळवा…

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील कोनड खुर्द येथील ३२ वर्षीय युवकाला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार अंढेरा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४० (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश बाबुराव जावळे (वय ३२, रा. कोनड खुर्द, ता. चिखली) हा युवक ३० सप्टेंबर रोजी रात्री ८ ते ८.१५ वाजताच्या सुमारास घराच्या परिसरातून बेपत्ता झाला. त्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला; मात्र तो आढळून न आल्याने त्याचे वडील बाबुराव तुकाराम जावळे (वय ६०) यांनी अंढेरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

बेपत्ता युवकाची उंची सुमारे ५ फूट ६ इंच असून, रंग गोरा व बांधा मजबूत आहे. त्याने निळ्या रंगाचा साधा शर्ट आणि पांढऱ्या रंगाची जीन्स परिधान केली होती. तसेच त्याच्या डाव्या गालावर जखमेचा व्रण असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनंतर अंढेरा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, बेपत्ता युवकाचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे फिरविण्यात आली आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ सिद्धार्थ सोनकांबळे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!