Advertisement Advertisement

चिखलीतील कुख्यात ईश्वरला पोलिसांनी घातला लगाम! जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; वर्षभर कारागृहात मुक्काम!मारामारी, दरोडा, खुनाचा प्रयत्न अन् बंदुकीच्या गुन्ह्यांचा हिशोब चुकता!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे याच्याविरुद्ध विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याला जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे शहर व परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे.

ईश्वर धनवटे याच्याविरुद्ध यापूर्वी मारामारी, चोरी, जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीररित्या बंदूक बाळगणे यांसह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच त्याच्या कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन चिखली शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी एमपीडीए कायदा १९८१ अंतर्गत त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.

सदर प्रस्तावाची सक्षम प्राधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात आल्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ईश्वर धनवटे याला एक वर्षाच्या कालावधीसाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर ही कारवाई केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पीएसआय शरद भागवतकर, पोलीस अंमलदार विजय किटे, अमोल गवई, अजय इटावा, प्रशांत धंदर, राहुल पायघन, नीलेश सावळे, ज्ञानेश्वर शिंदे, ललिता खरात आणि रुपाली उगले यांचा सहभाग होता.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!