Advertisement Advertisement

शाळेत जाताना १५ वर्षांच्या पोरीचा पाठलाग! ‘माझ्यासोबत चल, नाहीतर उचलून नेतो’ची धमकी; देऊळगाव राजात गुन्हा….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला धमकी दिल्याच्या आरोपावरून देऊळगाव राजा पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह पोक्सो कायद्यातील कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २५ सप्टेंबर रोजी करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी शिक्षण घेत असून शाळेत ये-जा करत असताना आरोपी दशरथ सखाराम चित्ते तिचा पाठलाग करीत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, तिच्यावर दबाव आणत धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, आरोपीने मुलीच्या आई-वडिलांसोबतही वाद घातला. यावेळी त्याने आपण कोणालाही घाबरत नसल्याच्या स्वरूपाची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. सुरुवातीला कुटुंबाची बदनामी होऊ नये, या कारणास्तव पोलिसांत तक्रार करण्यात आली नव्हती. मात्र, त्रास वाढत गेल्याने अखेर मुलीने देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोहोळकर करीत आहेत.

दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन ठोसरे, पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सविता कुवारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रकरणाचा पुढील तपास देऊळगाव राजा पोलिसांकडून सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!