Advertisement Advertisement

कावड यात्रा आनंदात सुरू झाली, पण अपघातानं सगळं होत्याचं नव्हतं केलं; कपील चौधरींचा दुर्दैवी अंत…..

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): तापी-पुर्णा संगमावरून जल आणण्यासाठी निघालेल्या कावडधाऱ्यांच्या वाहनाला ४ सप्टेंबर रोजी अपघात होऊन वाहन पलटी झाले होते. या भीषण अपघातात कपील बाबुराव चौधरी (वय ३२ वर्षे, रा. सजनपुरी) यांच्यासह १० ते १२ कावडधारी जखमी झाले होते. जखमींवर विविध ठिकाणी उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान कपील चौधरी यांचा २४ सप्टेंबर रोजी मृत्यू झाल्याने सजनपुरी परिसरावर शोककळा पसरली आहे.

सजनपुरी येथील शिवभक्त युवा ग्रुपच्या वतीने कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कावड यात्रेदरम्यान तापी-पुर्णा संगमावरून जल आणण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी कावडधारी वाहनाने रवाना झाले होते. याचवेळी वाहनाचा अपघात होऊन ते पलटी झाले. अपघातात कपील चौधरी यांच्यासह १० ते १२ जण जखमी झाले होते. कपील चौधरी यांना पुढील उपचारासाठी जळगाव खान्देश परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू असतानाच २४ सप्टेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. कपील चौधरी यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, एक मुलगी तसेच मोठा आप्तपरिवार आहे. कावड यात्रेदरम्यान घडलेल्या या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याने सजनपुरीसह परिसरातील शिवभक्तांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!