60 वर्षीय म्हणताऱ्याची 16 वर्षाच्या नातवाच्या वयाच्या मुलासोबत गैरवर्तनाचा प्रयत्न; पोलिस ठाण्यात पोक्सोखाली गुन्हा दाखल…

नांदुरा(बुलडाणा कव्हरेज न्युज)वडनेर भोलजी येथे माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ६० वर्षीय व्यक्तीने १६ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत अयोग्य वर्तन करून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगपूर (ता. नांदुरा) येथील १६ वर्षीय मुलगा दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.१५ वाजता वडनेर भोलजी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ बसलेला होता. त्यावेळी सुनील सातव (वय ६०, रा. वडनेर भोलजी) याने मुलाला गाठून त्याच्याशी अयोग्य वर्तन केल्याची तक्रार आहे.

घाबरलेल्या मुलाने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच वडनेर भोलजी पोलीस चौकीचे पोलीस अंमलदार अजय सुरडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पीडित मुलाच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आरोपी सुनील सातव याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) २०१२ अंतर्गत कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार करीत आहेत.

या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!