Advertisement Advertisement

तहसील चौकातून २० वर्षांची विवाहित तरुणी बेपत्ता; नातेवाईकांचा शोध सुरू….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मलकापूर शहरातील तहसील चौक परिसरातून २० वर्षीय विवाहित तरुणी कोणालाही काही न सांगता अचानक निघून गेल्याची घटना ७ मार्च रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंग क्र. २१/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सौ. सुनिता पांडुरंग फरपट (वय ४०, रा. शिरसोळी ता. नांदुरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी भाग्यश्री उर्फ आरती पांडुरंग फरपट (वय २०, रा. प्रतापनगर ता. तेल्हारा जि. अकोला) ही ७ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता मलकापूर येथील तहसील चौक परिसरातून कुणाला काही न सांगता निघून गेली. परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती आढळून आली नाही.

बेपत्ता तरुणीचा रंग निमगोरा, उंची अंदाजे ५ फूट ३ इंच, बांधा सडपातळ, केस लांब व काळे असून अंगात कथ्थई रंगाची साडी व ब्लाउज होता. हातात गुलाबी बांगड्या, गळ्यात सोन्याची गहुपोत, सोबत काळ्या रंगाची पर्स व पायात सोनेरी रंगाची सॅन्डल असल्याचे सांगण्यात आले आहे. या वर्णनाची तरुणी आढळल्यास मलकापूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!