Advertisement Advertisement

विहिरीत बुडून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू…! चिखली तालुक्यातील घटना….

मंगरूळ नवघरे (बुलडाणा कव्हरेज न्युज) : इसोली येथे एका ७० वर्षीय वृद्धाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. ही घटना २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास समोर आली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत वृद्धाचे झालेल्या व्यक्तीचे नाव किसन ज्ञानबा गवळी हे असून त्याचे वय ७०असे आहे. याबाबत समाधान सुपेकर यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. इसोली येथील रहिवासी असलेल्या रामकिसन गवळी यांचा मृतदेह विठ्ठल येवले यांच्या मुंगी शिवारातील गट क्रमांक १४९ मधील शेतातील विहिरीत आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पुढील तपासणीसाठी शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. रामकिसन गवळी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दिलीप तोंडे करीत आहेत. पुढील तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!