Advertisement Advertisement

STATE CRIME NEWS: प्रेयसीला हॉटेलात बोलावलं, ती हॉटेल मध्ये येताच त्याने त्या गोळ्या घेतला अन् प्रेमाचं भयंकर कांड घडलं! विरोध करताच तरुणीचा जीव घेतला….

उत्तर प्रदेश :(कव्हरेज ग्रूप नेटवर्क) उत्तर प्रदेशातील आग्रा परिसरात प्रेमसंबंधातून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीला हॉटेलमध्ये बोलावल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यावेळी तरुणीने प्रतिकार केला असता तिच्यावर जीवघेणा हल्ला करून तिची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन यादव उर्फ राहुल याने आपल्या प्रेयसीला हॉटेलमध्ये बोलावले होते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. यावेळी त्याचा मित्र अभिषेकही तेथे उपस्थित होता. तरुणीने या प्रकाराला विरोध केल्यानंतर नितीनने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच तरुणीच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मुख्य आरोपी नितीन यादव उर्फ राहुल याच्यासह त्याचा साथीदार अभिषेक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध

घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मुख्य आरोपीला काही तासांतच एका खासगी रुग्णालयातून अटक करण्यात आली. दरम्यान, दुसरा आरोपी अभिषेक हा फरार असल्याने पोलिस पथके त्याचा शोध घेत होती.

आरोपीच्या अटकेसाठी फिरोजाबादसह आग्रा, मैनपुरी, मथुरा आणि दिल्ली-एनसीआर परिसरातील विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमारी केली. अखेर दाहिनी पुलिया ते आतेपूर रोडदरम्यान नाकाबंदी करून शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी पोलिसांनी अभिषेकला अटक केली.

शिकोहाबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी अनुज कुमार राणा यांनी अभिषेकच्या अटकेची माहिती दिली. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाच्या आदेशानंतर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, घटनेमागील संपूर्ण परिस्थिती आणि आरोपींच्या भूमिकेचा तपास केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!