सिंदखेड राजा–देऊळगाव राजा येथे “अजितदादा अमर रहे”च्या गगनभेदी घोषणा; बुलढाणा जिल्ह्यात अस्थिकलश यात्रेचे भावपूर्ण….

सिंदखेड राजा/देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)गोरगरिबांचे कैवारी, जनतेचे लाडके नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजितदादांचे निधन संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठी हानी ठरली आहे. त्यांच्या निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली असून, बुलढाणा जिल्ह्यात त्यांच्या अस्थिकलश यात्रेला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

सिंदखेड राजा व देऊळगाव राजा परिसरात “अजितदादा अमर रहे” अशा गगनभेदी घोषणा देत नागरिकांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी अस्थिकलश यात्रेचे स्वागत केले. अजितदादांच्या अस्थिकलशाचे विसर्जन राष्ट्रमाता जिजाऊ , सिंदखेड राजा येथे करण्यात आले.या अस्थिकलश यात्रेचे जिल्ह्यातील विविध तालुक्यांत व गावागावांत दर्शन घेण्यात आले. ठिकठिकाणी शोकसभा घेण्यात येत अजितदादांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.

संत चोखामेळा यात्रास्थळी आयोजित शोकसभेत माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, शिवसेना नेते दादाराव खाऊ, दीपक बोरकर, लिपस्टिकन पार्टीचे नेते दिलीप खरात यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. “गोरगरिबांची न्यायदेवता हरपली,” अशा शब्दांत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अस्थी विसर्जन प्रसंगी माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, सौ. वनिता भूतडा, माजी सभापती नितीन शिल्ले, माजी नगराध्यक्ष देविदास नेमाने, विष्णू मेहेरे, संतोष साईभराड, रियाज शेख, शेख बसीन, सिद्धार्थ साधा, वैभव मीनासे, प्रकाश गीते, सुनील जुळकर, सदाशिव मुंडे, सचिन आंधळे, गणेश सोरे, मंगेश सुरपे, सागर मेढावे, उमेश खरात, अभिजीत राजे आदींसह असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी संजय खडसे तहसीलदार यांनीही उपस्थित राहून आदरांजली अर्पण केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!