मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) मेहकरजवळील फैजलापूर टोल नाक्याच्या पुढे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (१० नोव्हेंबर) रात्री सुमारे नऊच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव नावेद अब्बास (वय ५२) तर जखमीचे नाव बिलाल अब्बास झफर असे आहे. दोघेही मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी असून, ते मालवाहू वाहनातून मालेगावकडे जात होते.दरम्यान, फैजलापूर टोल नाक्याजवळ त्यांच्या वाहनाचा वेग अचानक नियंत्रणाबाहेर गेल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. या अपघातात नावेद अब्बास यांचा जागीच मृत्यू झाला, तर बिलाल अब्बास झफर गंभीर जखमी झाले.घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ दोघांनाही मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी नावेद अब्बास यांना मृत घोषित केले. बिलाल अब्बास यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या प्रकरणी मेहकर पोलिसांनी पंचनामा करून घटनेची नोंद घेतली आहे.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : उत्तर प्रदेशातील एकाचा मृत्यू, एक जखमी..
Published On: November 12, 2025 10:26 am














