रनिंगचा सराव करताना १९ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू….

मंगरूळ नवघरे (बुलडाणा कव्हरेज न्युज) – मेहकर तालुक्यातील सारशिव येथे १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. रनिंगचा सराव करत असताना दीपक रामदास जाधव (वय १९, रा. सारशिव) याचा अचानक मृत्यू झाला. धावत असताना त्याला अचानक छातीत दुखू लागल्याने त्याची प्रकृती बिघडली.


मिळालेल्या माहितीनुसार, दीपक हा मुंबई येथे ग्राउंड असल्याने पूर्वतयारीसाठी सारशिव फाटा ते मंगरुळ नवघरे परिसरात नियमित सराव करत होता. सरावादरम्यान अचानक त्याची तब्येत खालावल्याने उपस्थितांनी तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि त्याचा मृत्यू झाला.


या घटनेमुळे सारशिव गावावर शोककळा पसरली असून मित्रपरिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे. दीपक हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील व दोन बहिणी असा परिवार आहे. गावात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!