Advertisement Advertisement

शेतात पाणी द्यायला गेला; सकाळी पाहिलं तर धक्काच बसला..! चिखली तालुक्यातील घटना….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली तालुक्यातील भरोसा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भरोसा येथील २४ वर्षीय तरुण सागर कचरू जोहरे याचा खडकपूर्णा पाटात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून वातावरण शोकमग्न झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर हा मेरा खुर्द फाटा येथील पेट्रोल पंपावर काम करत होता.१९ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १ वाजता तो शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता. मात्र सायंकाळपर्यंत तो घरी न परतल्याने घरातील सर्व कुटुंबीय चिंतेत पडले. त्याची दुचाकी आणि चप्पल खडकपूर्णा पाटाजवळ आढळून आल्याने नातेवाईक व ग्रामस्थांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही तो सापडला नव्हता.

अंढेरा पोलीस ठाण्याच्या सूचनेनुसार पाटबंधारे विभागाने पाट बंद केला. त्यानंतर दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजता भरोसा येथील पंप हाऊसजवळील लोखंडी जाळीत सागरचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत आढळून आला.

सागरला पोहता येत नसल्याने पाय धुण्यासाठी पाटात उतरल्यावर त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा कोणाशीही वाद नसल्याने कोणताही संशय नसल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे.

घटनेची नोंद अंढेरा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!