Advertisement Advertisement

नदीपात्रात १७ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळला; मोताळा तालुक्यात खळबळ…

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील बोराखेडी-रिधोरा शिवारात नवीन तहसील कार्यालयामागील नदीपात्रातील पाण्याच्या डोहात १७ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून बोराखेडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोराखेडी येथील कु. गौरी शरद फुंड (वय १७) ही २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडली होती. मात्र, ती घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध सुरू केला. नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून शोधमोहीम राबविण्यात येत असताना तीचा काहीच पत्ता लागला नव्हता.

दरम्यान, २१ फेब्रुवारी रोजी दुपारी बोराखेडी शिवारातील नवीन न्यायालयाच्या मागील गिट्टी खदानजवळील नदीपात्रातील खोल डोहात एका युवतीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून घटनास्थळाची पाहणी केली तसेच फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले.

घटनास्थळावरून कपडे व इतर महत्त्वाचे नमुने जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

सदर घटनेप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे बोराखेडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!