हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल….

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : माहेरहून १० लाख रुपये आणण्याचा तगादा लावत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध मेहकर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील समता कॉलनी परिसरात राहणाऱ्या नेहा विरेंद्र ढवळे (वय ३५) यांचा विवाह विरेंद्र ढवळे यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर सुरुवातीला काही दिवस सर्व काही सुरळीत होते. मात्र त्यानंतर पती विरेंद्र ढवळे, सासू-सासरे, नणंद व दिर यांनी संगनमत करून नेहा यांच्याकडे माहेरहून १० लाख रुपये आणण्याची मागणी सुरू केली. पैशांची मागणी पूर्ण न झाल्यास जीवे मारण्याची धमकी देत त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे.

या प्रकरणी नेहा यांनी महिला तक्रार निवारण कक्षाकडे धाव घेतली होती. तेथे समुपदेशनाद्वारे तडजोडीचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तो निष्फळ ठरला. त्यानंतर महिला तक्रार कक्षाच्या अहवालानुसार मेहकर पोलिसांनी आरोपी विरेंद्र ढवळे याच्यासह सासरच्या इतर पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!