Advertisement Advertisement

आज चिखलीत ‘श्री सिद्धिविनायक बालरुग्णालय’चे भव्य उद्घाटन…! छ. संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञांची सेवा आता चिखलीकरांसाठी उपलब्ध….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – चिखली शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून, लहान मुलांच्या उपचारांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले ‘श्री सिद्धिविनायक बालरुग्णालय’ आज रविवार सकाळी ११ वाजता सुरू होत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील अनुभवी व सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. धनंजय राजेंद्र पाटील (एमबीबीएस, डीसीएच, डीएनबी) आणि डॉ. धनश्री धनंजय पाटील (एमबीबीएस, एमडी मेडिसिन) यांच्या मार्गदर्शनाखाली हे रुग्णालय सुरू होणार आहे.

या बालरुग्णालयात नवजात शिशु व लहान मुलांच्या सर्व आजारांवर तज्ज्ञ उपचार, नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU), फोटोथेरपी, बालरोग अतिदक्षता विभाग (PICU), तसेच आधुनिक वैद्यकीय उपकरणांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लहान मुलांच्या लसीकरणाची संपूर्ण सुविधा, नेब्युलायझर, सर्दी-खोकला-ताप यांसारख्या आजारांवर उपचार, तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची नियमित सेवा येथे मिळणार आहे.

रुग्णालयात २४ तास आपत्कालीन सेवा, २४ तास फार्मसी व पॅथॉलॉजी सुविधा, तसेच प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता राहणार आहे. त्यामुळे चिखली शहरासह परिसरातील नागरिकांना आता बालरोग उपचारासाठी बाहेरगावी जाण्याची गरज भासणार नाही.

‘श्री सिद्धिविनायक बालरुग्णालय’चा पत्ता:

पहिला मजला, एसएमएस टॉवर, बस स्थानकासमोर, चिखली, ता. चिखली, जि. बुलडाणा.

या नव्या रुग्णालयामुळे चिखली शहरात बालरोग उपचारासाठी आधुनिक व विश्वासार्ह सुविधा उपलब्ध होणार असून नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!