मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) :
घरी कोणालाही काहीही न सांगता १८ वर्षीय तरुणी घरातून निघून गेल्याची घटना मलकापूर तालुक्यात घडली असून, याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत फिर्यादी गणेश गुणवंत भारती (वय ५८) रा. घिर्णी ता. मलकापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते घरी असताना त्यांची मुलगी कुं. दिपाली गणेश भारती (वय १८ वर्ष) ही कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. बराच वेळ उलटूनही ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. मात्र, दिपालीचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.
अखेर वडिलांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून पोलीसांनी मिसिंग क्रमांक १३/२०२६ नुसार हरवल्याची नोंद घेतली असून पुढील तपास पोलीस हवालदार सचिन पाटील हे करीत आहेत.
तरुणी अचानक घरातून निघून गेल्याने घिर्णी परिसरात चर्चेला उधाण आले असून, पोलीसांकडून तिचा शोध सुरू आहे.














